मुख्य सामग्रीवर वगळा

वैदिक गणित आणि समज - गैरसमज

       आपल्यापैकी बर्‍याच लोकांनी वैदिक गणिताबद्दल काही ना काही नक्कीच ऐकल असेल. या विषयावर वेगवेगळ्या भाषांमध्ये अनेक पुस्तके, ब्लॉग लिहिले जात आहेत. गणित सोडवण्याची जादुई पद्धत वगैरे वगैरे.. असा गौरव भरपूर लोक करत आहेत.
       येता जाता आपण अनेक ठिकाणी वैदिक गणिताचे वर्ग, सेमिनार या बद्दल वाचत किंवा ऐकत असाल. या सगळ्या गोष्टीमुळे आपल्यापैकी बहुतेकांना या बद्दल काही प्रश्न पडले असतील. तर चला जाणुन घेवुयात वैदिक गणित विषया संबंधित शंका- कुशंका...!

वैदिक गणित काय आहे?
       हा एक सूत्रसंग्रह आहे ज्याची रचना कींवा संशोधन गोवर्धन पीठाचे शंकराचार्य श्री. भारतीकृष्ण महाराज यांनी केली.
       आपण सर्वांनी शाळेत ऐकलच असेल की, कोणतेही गणित अनेक पध्दतीने सोडवता येते त्यातलिच वैदिक गणित ही सुध्दा एक सोपी पध्दत आहे असं आपल्याला म्हणता येईल.
       वैदिक गणितात एकुण २९ (१६ मुख्य सूत्रे व १३ उपसूत्रे) लहान लहान सूत्र आहेत. प्रत्येक सूत्र अनेक प्रकारचे गणिते सोडवण्यासाठी वापरता येते.

वैदिक गणितामुळे गणित खरच सोप होत का?
       तर या प्रश्नाचे सरळ सरळ उत्तर हो.. असे देता येईल. यातल्या सूत्रांच्या मदतीने आपण अनेक प्रकारातील गणिते शाळेत शिकवल्या जाणार्‍या पध्दतीपेक्षा कमी वेळात व सोप्या पध्दतीने सोडवू शकतो. हो पण त्यासाठी एक छोटीशी अट आहे, ती अशी की, कारण या सूत्रांच्या आधारे गणित सोडवण्याची पध्दती आपल्या पारंपरिक पद्धतिंपेक्षा थोड्या वेगळ्या असल्यामुळे सुरवातीला थोड्यावेळ अवघड वाटतील पण काही दिवसातच या पध्दतींने गणिते सोडवणे खुप सोपे (पारंपरिक पध्दतीपेक्षा) आहे हे आपल्या लक्षात येईल.
       जर आपण या पध्दती शिकायला सुरुवात करत असाल तर (२-३ महीने) काही दिवस तरी व्यवस्थित व मन लावून, नियमित सराव करत मनात या पध्दतीच्या सुलभतेवर कुठलाही शंका न धरता शिका ही विनंती... काही दिवसातच तुमची गणिते करण्याची गती वाढलेली तुमच्या लक्षात येईल.

या पध्दतिंने आपण गणकयंत्रापेक्षा (calculator) जलद गतीने उत्तर देऊ शकतो का?
       हा प्रश्न आपल्याला नक्कीच पडला असेल. कारण आपण अनेक पुस्तकांच्या दुकानाबाहेर वैदिक गणिताच्या मदतीने कॅल्क्युलेटरपेक्षा जलद उत्तर द्या, अशा प्रकारच्या जाहीराती वाचल्या असतिल. बरोबर ना?
       या प्रश्नाच उत्तर नाही असच देण योग्य राहिल. शेवटी एखाद्याच्या आवडी निवडीवर व प्रतिभेवर अवलंबून आहे पण तरीही आपल्यासारख्या सामान्य माणसासाठी तरी हे अवघड आहे. पण हो तुमच्या नेहमीच्या वेळेपेक्षा नक्कीच कमी वेळात व सोप्या पद्धतीने (सुरवातीला अवघड आहे अस वाटल तरी शेवटी एखादी वेगळी गोष्ट अंगवळणी पडण्यासाठी थोडा वेळ तरी नक्कीच लागतो.) तुम्ही प्रश्न सोडवु शकाल याची खात्री बाळगा.
       शेवटी मशीन आणि माणसाची तुलना करणे चुकीचे आहे. नाही का?

वैदिक गणित खरच वैदिक काळातील आहे का?
       खर तर स्वामीजींनी त्यांच्या पुस्तकांच्या प्रस्तावनेतच वेद या शब्दाचा अर्थ माहीतीचा अमर्याद साठा असा घेतला आहे हे स्पष्ट केले आहे त्यामुळे हा प्रश्न पडण्याचे कारण नाही. पण जर वरील प्रश्नाचे उत्तरच द्यायचे असेल तर ते उत्तर नाही असच द्यावे लागेल.
       ही सर्व सूत्रे स्वामीजींनी रचली आहेत. हे सगळे सूत्र त्यांना त्यांच्या वेद अध्ययन काळात वेदात व जून्या भारतीय ग्रंथांमध्ये सांगितल्या गेलेल्या गणिताच्या संकल्पनांचा तसेच पध्दतींचा अभ्यास करताना स्फुरली (सुचली). त्यामुळे या सूत्रांचा वेदांशी काही अंशी संबंध असला तरी ते वेदात सापडत नाहीत.
       म्हणतात ना एखादे शास्त्र कीती जूनं आहे हे पहाण्यापेक्षा ते चांगल आहे का वाईट? कींवा त्यातून आपल्याला काही उपयोगी आणि नविन काही शिकायला भेटतय का नाही हे जास्त महत्वाचे.

       वैयक्तिक पणे सांगायचे झाले तर मी गणिताच्या पध्दती किमान लहान विद्यार्थ्यांना (ईयत्ता ५ वी पासुन) शिकवण्याची विनंती करेल. मुख्य म्हणजे या पध्दतींमुळे लहान मुलांच्या मनात गणिताबद्दल असणारी भिती नक्कीच संपेल याची मला खात्री वाटते.. हे ही नसे थोडके. 
        जर तुम्ही वैदिक गणित शिकायचा विचार करत असाल तर मुळ पुस्तकापेक्षा खलिल पुस्तकांपासून सुरवात केल्यास सोपे जाईल (तुम्ही मुळ वैदिक गणित या पुस्तकाचे मराठी भाषांतरीत पुस्तक खरेदी करू शकता त्याची लिंक मी खाली देत आहे) :-
ब. गं. बापट व दिलीप कुलकर्णी भाषांतरीत :- समजेपर्यंत जादू वाटणारे वैदिक गणित या ४ पुस्तकांपासून करावी या ४ पुस्तकांच्या संचाची एकूण किंमत ८० - ९० च्या आसपास आहे.

वैदीक गणित (मराठी) पुस्तक खरेदी करण्यासाठी इथे क्लिक करा.

टिप्पण्या